(Bribe) पुणे : कार परत मिळवून दिल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षकाला बुधवारी (ता.५) अटक केली आहे.
शशिकांत नारायण पवार (पोलीस उपनिरीक्षक, अभिरुची पोलीस चौकी, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार…!
तक्रारदार यांच्या मालकीची मारुती इटींगा कार त्यांचा बदली चालक परस्पर कर्नाटक येथे घेवून गेला होता. सदरचे वाहन परत मिळवून देणेसाठी तक्रारदार यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. तक्रारदार यांनी कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून लोकसेवक शशिकांत पवार यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पवारला अटक केली आहे.
पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Bribe : लाचेपोटी आयफोनची मागणी करणाऱ्या पोलिस निरीक्षकास एसीबी कडून अटक!
Pune Crime : भाटघर धरणात तरुणी बुडाली ; शोधकार्य सुरु..!
Pune Accident : ह्रदयद्रावक ! खेळता खेळता तीन वर्षाच्या चिमुकलीला काळाने हिरावून नेले!