अजित जगताप
सातारा : पत्रकारितेच्या माध्यमातून देशाच्या स्वतंत्र व संयुक्त महाराष्ट्र आणि पुरोगामी चळवळीच्या लढ्यात अनेक पत्रकारांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेकांनी सहभाग घेतला आहे तसेच विविध क्षेत्रातही नावलौकिक प्राप्त करून पत्रकारिता एका उंचीवर नेऊन ठेवली आहे.त्याचा इतिहास आज ही नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना जनमानसात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अनेक पत्रकारांनी खूप मोठे योगदान दिले आहे. तसेच काही वेळेला टीकाटिप्पणीही सहन केली आहे.राजकीय पटलावर पत्रकारांचा दबदबा निर्माण करणाऱ्या काही पत्रकारांची लेखणी म्हणजे शस्त्र आहे.व्यवसायिक दृष्टीकोण ठेवूनही पत्रकारिता जिवंत ठेवणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांनी खऱ्या अर्थाने एक आदर्श पत्रकारिता जपली तसेच वेगळ्या क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
सातारा जिल्ह्यातील शिवसंदेश दैनिकाचे संपादक हरिभाऊ निंबाळकर यांनी फलटण येथून थेट आमदारी की पर्यत मजल मारली होती. एवढा पत्रकारितेचा दरारा होता. सहकार क्षेत्रात युनाटेड बँकेचे संचालक सुरेश पळणिटकर, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक म्हणून अनिल देसाई, गुजराथी अर्बन पतसंस्था मध्ये विनोद कुलकर्णी, साहित्य क्षेत्रात गेली काही वर्षे सातत्याने लेखन करणारे जेष्ठ साहित्यिक जयवंत गुजर, पदमश्री लक्ष्मण माने,प्रफुल्ल फडके, जयंत लंगडे, प्रशांत पवार, शिवाजी राऊत,विलास माने, अरुण जावळे,शिवाजी काळभोर, गजानन चेणगे,दीपक प्रभावळकर,मधु नेने,जयेंद्र क्षिरसागर यांनी साहित्य संमेलन गाजविले होते. आज ही त्यांचे साहित्य आवडीने वाचतात. शिक्षण क्षेत्रात घनश्याम छाबडा यांनी दैनिकाचे संपादक पद सांभाळून विविध प्रकारच्या व्यवसायातून घोडदौड सुरू ठेवली आहे. मुख्याध्यापक पोपट मिंड, सुनिल शेडगे, क्रीडा पत्रकारिता पुरस्कार प्राप्त शरद तथा आण्णा महाजनी, सिद्धार्थ लाटकर, फिरोज मुलाणी,
राजकीय पटलावर महाबळेश्वरचे नगराध्यक्ष पद भूषविणारे बबनराव ढेंबे, नरेश देसाई, ज्ञानेश्वर काळे, विश्वबर बाबर, संतोष साळुंखे, नगरसेवक पदावर कार्यरत असणारे बापूसाहेब जाधव, अनुप शहा, शशिकांत गुरव,रविंद्र बोतालजी, व्याख्याते विनोद बाबर,ग्राहक संरक्षण चळवळीत प्रा नागनाथ स्वामी, पर्यावरण व हरित क्रांती घडवून आणण्यासाठी झटणारे शेखर जाधव, मुन्ना मुल्ला तसेच एस टी महामंडळ सेवेतील रामचंद्र बोतालजी,संदिप गाढवे,नाट्यक्षेत्रातील तुषार भद्रे, शैलेंद्र पाटील,धनराज जगताप, चंद्रकांत देवरुखकर यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.पूर्वी साताऱ्यातील पोवई नाका येथे फळ्यावर बातमी लिहणारे क्रांतिकारक वसंतराव आंबेकर यांचा निर्भीडपणे वारसा जपणारे सुजित आंबेकर आज ही पत्रकारिता सोबत हॉटेल व्यवसायात वाटचाल करीत आहेत.
सध्या पत्रकारिता सोबतच हॉटेल व इतर व्यवसायात अनेकांनी यशस्वी होण्यासाठी हा मार्ग अवलंबून वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामध्ये चंद्रसेन जाधव,महेश पवार, केदार जोशी व समर्थ अकॅडमीचे निलेश कणसे, गुणवंत गायकवाड, कदम क्लासचे अविनाश कदम,फोटोग्राफी मध्ये देवराज कामाठी, एन सी सी चे प्रशिक्षक टी व्ही काळे, दलित मित्र गो मो वाघमारे, पुरोगामी विचारांचा प्रभाव व वारसा जपणारे दिनकर झिब्रे,विजय मांडके, विजय जाधव, विकास भोसले,राहुल तपासे, डाईनेल खुडे अशी भली मोठी नावे पत्रकारिता क्षेत्रात आदरयुक्तपणे घेतली जात आहेत.
ग्रामीण भागातील मुले थोडी बुजरी असतात पण, त्यांना संधी मिळाली तर त्याचे सोने करणारे श्रीकांत कात्रे, शरद काटकर, दिपक शिंदे, हरिष पाटणे, राजेश सोळस्कर,संग्राम निकाळजे, प्रगती जाधव-पाटील,सुरेश बोतालजी,सम्राट गायकवाड,शैलेंद्र धुमाळ,पराग शेणोलीकर, प्रशांत जाधव, संपत शिंदे, इम्तियाज मुजावर, दिपक शिंदे, मोहन मस्कर-पाटील,अरुण देशमुख यांचा आदर्श घेऊन अनेकांनी पत्रकारिता क्षेत्रात करिअर करायचंच असा विचार केला आहे. त्यातील बहुतेक पत्रकारांनी यश मिळवले आहे. सर्वाचाच उल्लेख करणे गरजेचे आहे. परंतु, जागे अभावी काहींचा अनावधानाने नाव लिहिणे इच्छा असूनही टाळावे लागत आहे. तरी ही नवनवीन पत्रकारांना या क्षेत्रात खूप मोठा वाव आहे. दुर्दैवाने काहींना चांगली साथ मिळत नाही. तरीही लवकरात लवकर वाचकांपर्यत माहिती पोहचविण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कराड, माण, जावळी, सातारा, फलटण, खंडाळा,वाई अशा ग्रामीण भागातून ही युट्युबच्या माध्यमातून आता स्थानिक वहिनीच्या प्रयत्नातून स्थानिक पातळीवर बातम्या प्रसिद्ध होत असल्याने माहितीचा खजिना उपलब्ध झाला आहे. त्याचे ही मनापासून कौतुक होत आहे.
जुन्या काळातील इम्तियाज मिर्झा,बाळासाहेब बहुलेकर,पा शी खांडेकर, ह ना दीक्षित, श्रीपाद टिकेकर,श्री बा आचार्य, व्ही एल चाफेकर, डॉ जगदीश पंचपोर, बाबूराव शिंदे, भाग्यश्री पंडित, मधुसूदन पत्की, संजय मोघे, पांडुरंग पवार, विजय कदम, ओमकार तपासे, रघुनाथ पोफळे, जितेंद्र जगताप,उमेश भामरे, अतुल देशपांडे, बापू आफळे, राजेंद्र त्रिगुणे, सुभाष देशमुख,एम. आर. शिंदे,तात्यासाहेब काळे, बाबा पटवर्धन, बबनराव क्षिरसागर,विमल नलावडे, नम्रता भोसले, बाळासाहेब जाधव,बाळा कुलकर्णी, चं,ने.शहा,जगन्नाथ जावळीकर,बी एच चाफेकर,अनिल गोडसे अशा पत्रकारांनी केलेल्या कार्याची दखल आज ही घेतली जात आहे. हे त्यांच्या कार्याची पोहच पावती समजली जात आहे.
नव्या पिढीला तांत्रिकदृष्ट्या पत्रकारितेचा काम सोपे झाले असले तरी सध्या रेडिमेड बातम्या व छायाचित्रे उपलब्ध होत असल्याने तोचतोच पणा जाणवू लागला आहे. अशी ही खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे किमान आठवड्यातून एक तरी वेगळी बातमी देणे गरजेचे आहे. हे सूचित करावे वाटत आहे.