Pune Crime | पुणे : मित्रांकडून पैसे घेत त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यास पत्नीला भाग पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशासाठी पतीनेच पत्नीला वेश्याव्यवसाय करयासाठी भाग पाडल्याचे समोर आले आहे.
याबाबत एका विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार पतीसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीने पैशाची गरज भागवण्यासाठी महिलेला मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले.
पतीच्या मित्रांनी केले अनैसर्गिक कृत्य…
त्यानंतर पतीच्या मित्रांनी तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. फिर्यादी महिला रास्ता पेठ भागातून जात होती. पतीच्या मित्रांनी तिला रस्त्यात अडवले. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!