Purandar Trap | पुरंदर : जमिनीच्या सातबाऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चांबळी (ता. पुरंदर) येथील महिला तलाठ्यासह मदतनीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सोमवारी (ता.३) रंगेहाथ अडकला आहे.
लोकसेवक निलम मानसिंग देशमुख (वय ३२, तलाठी सजा चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे) व नारायण दत्तात्रय शेंडकर (वय ५०, मदतनीस) असे रंगेहाथ पकडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
पुरंदर तालुक्यातील चांबळी तलाठी कार्यालयातील घटना…!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईंचे जानेवारी २०२३ मध्ये निधन झाले होते. त्यांचे ७/१२ उता-यावरून नाव कमी करण्यासाठी चांबळी येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ७/१२ उता-यावरील नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक तलाठी निलम देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली व त्यांचे मदतनीस खाजगी इसम नारायण शेंडकर यांनी २ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Accident News : ट्रॅक्टरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी..!