SSC-HSC Exam 2023 पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा वेळेवर लागणार आहे. बारावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. अशी माहिती मिळाली आहे.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, संप मागे घेतल्याने दहावी-बारावीचा निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम शिक्षक जलद गतीने करीत आहेत. बारावीचे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर दहावीच्या बोर्ड परीक्षेची पेपर तपासणीची डेडलाईन १५ एप्रिल असणार आहे.
दरम्यान, दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चच्या काळात झाल्या. यंदा दहावीच्या परीक्षेला १५ लाख,७७ हजार, २५६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२३ या काळात आयोजित करण्यात आला आहे. बारावीच्या बोर्डाची परीक्षेस राज्यात १४ लाख ५७ हजार २९३ परीक्षेस बसले होते.