शिरूर : Shirur Crime – खंडाळे (ता. शिरूर) (Shirur Crime) येथे गेल्या ५ वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश एस आर नांवदर यांच्या खंडपीठाने दिले आहेत. (Shirur Crime)
विकास बबन खेडकर (वय-५८, रा खंडाळे खेडकर मळा ता शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर प्रकाश मच्छिंद्रनाथ खेडकर (वय ३४, रा. खंडाळे ता. शिरूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश यांचे वडील मच्छिंद्रनाथ सिताराम खेडकर (वय ७०, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार, रा. खंडाळे, खेडकर मळा, ता. शिरूर जि पुणे) यांनी रांजणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
शिरुर तालुक्यातील खंडाळे येथे ५ वर्षापूर्वी झाला होता खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मच्छिंद्रनाथ खेडकर हे पुणे शहर दलातून सहाय्यक फौजदार या पदावरून २००७ या साली सेवानिवृत्त झाले. तर आरोपी विकास खेडकर आणि प्रकाश खेडकर हे दोघे नात्याने चुलत भाऊ आहेत. मुलगा प्रकाश याचे रेखा यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना दुर्वा व आरव असे दोन मुले आहेत. मुलगा प्रकाश आणि रेखा यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यामुळे सून रेखा मुलांना घेऊन शिक्रापूर येथे माहेरी गेली होती.
दरम्यान, मुलगा प्रकाश हा पुतण्या विकास याच्या २१ डिसेंबर २०१७ रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घरी गेला. आणि तुझ्यामुळे माझा संसार मोडला, माझी पत्नी माझे सोबत राहत नाही. असे म्हणून प्रकाश हा विकास सोबत वाद घालू लागला. तेंव्हा विकास याने त्यास समजावण्याचा प्रयत्न केला परंतू प्रकाश हा ऐकत नव्हता.
सततचे वादास कंटाळून आरोपी विकासने प्रकाशला डोळयात मीरची पावडर टाकली. व पायावर लोखंडी अँगलने मारहाण केली. तसेच प्रकाश खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड मारून त्यास जखमी केले. तेव्हा प्रकाशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मच्छिंद्रनाथ खेडकर यांनी रांजणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी विकास खेडकर याला अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा न भरल्यास तीन महिने शिक्षा ठोठाविली आहे. तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश एस आर नांवदर यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांना रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, अमोल गोरे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, विशाल गव्हाणे आणि मुस्ताक शेख यांची मदत मिळाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :