Bhor News |भोर, (पुणे) : मागील चार दिवसात भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४ मुली व २ मुले असे एकूण सहाजण बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पालक रागावल्यामुळे पळून गेलेल्या मुलाला पोलिसांनी शोधून पुन्हा घरी सोडले तर एक मुलगी लग्न करून पोलिस ठाण्यात हजर झाली. उर्वरित तीन मुली व एक मुलगा अद्यापही बेपत्ता असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर शहरातून दोघेजण आणि शहराशेजारील गावांमधून चौघेजण पळून गेलेले आहेत. पळून गेलेल्या मुली या १८ ते २२ वयोगटातील आहेत. त्यापैकी दोन मुलींचे लग्न ठरलेली होती. एका मुलीचा कुंकवाचा कार्यक्रम झाला होता तर एकीचा साखरपुडा झाला होता. पुढील काही दिवसात दोघींची लग्नाची तारीख होती.
आई-वडील आत्महत्या करण्याच्या तयारीत…
परंतु दोन्ही मुली लग्नाअगोदरच पळून गेल्या. आई-वडिलांनी लाखो रुपये खर्चून लग्नाची तयारी सुरू केली होती. मुलगी पळून गेल्यामुळे प्रतिष्ठेमुळे काही आई-वडील आत्महत्या करण्याच्या तयारीत होते. परंतु पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. पळून गेलेल्या तिसऱ्या मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू होती. दोन मुली या रामनवमीच्या उत्सवानंतर एकाच दिवशी पळून गेल्या आहेत.
दरम्यान, प्रतिष्ठेसाठी पोलिस ठाण्यात मुलींचे वडील तक्रार दाखल करीत नाहीत. याचीही संख्या तालुक्यात अधिक असल्याचे पोलिस ठाण्यातर्फे सांगण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Rahul Kul | दौंड तालुक्यातील निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने लढणार; आमदार राहुल कुल
Maharashtra Govt News | शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू