युनूस तांबोळी
शिरूर : Shirur News : राज्यातील सार्वजनीक वितरण व्यवस्थेतंर्गत पात्र शिधापत्रीकाधारकांसाठी शासनाने आनंदाचा शिधा पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभिनव व आवश्यक अशी योजना असून यात पात्र गरजूंना या आनंदाच्या विविध प्रसंगासाठी मोठी मदत झाली आहे. Shirur News कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे स्वस्त धान्य दुकानांअतर्गत आनंदाचा शिधा वाटण्यात येत असल्याची माहिती सरपंच सुनिता पोकळे यांनी दिली आहे. (Shirur News)
शिरूर तालुक्यात शनिवार पासून शिदा वाटण्यास प्रारंभ
राज्यातील सार्वजनीक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न य़ोजना, प्राधान्य कुटूंब तसेच १४ शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्यरेषेवरील ( एपीएल ) केशरी शेतकरी शिधापत्रीकाधारकांना आनंदाचा शिधा वितरणास सुरूवात झाली. शनिवार ( ता. १ ) पासून शिरूर तालुक्यात शिधापत्रीकांधारकांसाठी ही योजना सुरू झाली आहे. यासाठी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा पोहचविण्याचे नियोजन केले आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील पात्र गरजूंना याचा विशेष लाभ होणार असल्याची माहिती स्वस्त धान्य दुकानदार दिपक दुडे व गणेश रत्नपारखी, कुशाबा मुंजाळ यांनी दिली.