Tel Aviv University | तेल अबीव : वनस्पती आणि झाडे-झुडपेसुद्धा एकमेकांशी बोलतात. असा दावा तेल अविब विद्यापीठातील काही संशोधकांनी केला आहे. तसेच त्यांच्या संवादाची फ्रिक्वेन्सी एवढी जास्त असते की मानवी कानाला त्यांचा तो संवाद ऐकू येत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.
संशोधकांनी हा प्रयोग कसा केला….
संशोधकांनी काही वनस्पती अतिशय शांत आणि कोणताही आवाज नसलेल्या एका खोक्यामध्ये ठेवली. आणि त्याच्या आसपास अल्ट्रासोनिक मायक्रोफोन आणि रेकॉर्डर ठेवण्यात आले. या मायक्रोफोनची फ्रिक्वेन्सी २० ते २५० किलोहर्ट्झ ठेवण्यात आली होती. जेव्हा या मायक्रोफोन्सने काही आवाज ध्वनीमुद्रित केले.
तेव्हा एक विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या मशीनवर हे आवाज ऐकण्यात आले. तेव्हा वनस्पती आणि झाडेझुडपे सुद्धा तणावाच्या परिस्थितीमध्ये आवाज काढतात किंवा एकमेकांशी संवाद साधतात ही गोष्ट संशोधकांच्या लक्षात आली.
वनस्पतींना सुद्धा जीव असतो आणि भावना असतात अशा प्रकारचे संशोधन कित्येक वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी केले होते. याच संशोधनाचा पुढील भाग समोर आला आहे.सेल नावाच्या एका सायंटिफिक जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले असून वनस्पती आपल्या आयुष्यामध्ये किती विविध प्रकारचे आवाज काढत असतात आणि संवाद साधत असतात. याची माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
वनस्पतींनी काढलेले आवाज ध्वनीमुद्रित करण्यातही यश…
लिल्याच हेडानी या संशोधकाच्या नेतृत्वाखाली हे महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात वनस्पती आणि झाडेझुडपांच्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते. तेव्हा ते अल्ट्रासॉनिक साऊंड प्रसारित करतात असे या संशोधनात म्हटले आहे. या संशोधकांनी काही वनस्पतींनी काढलेले आवाज ध्वनीमुद्रित करण्यातही यश मिळवले आहे.
या संशोधनात टोमॅटो आणि तंबाखूच्या वनस्पतींनी काढलेले आवाज आणि संवाद ध्वनिमुद्रित केले आहेत. या संशोधकांनी जे आवाज ध्वनीमुद्रित केले आहेत. ते एखाद्या पॉपकॉर्नप्रमाणे आहेत. म्हणजे एखाद्या धान्यापासून जेव्हा लाही तयार होते. तेव्हा जसा आवाज येतो. त्या प्रकारचा आवाज या संशोधकांनी ध्वनीमुद्रित केला आहे.
दरम्यान, वनस्पती आणि झाडेझुडपे जरी अशा प्रकारचे संवाद साधत असतील किंवा विविध प्रकारच्या आवाज काढत असले तरी मानवी कानाला मात्र ते आवाज ऐकू येत नाहीत. वनस्पतींनी काढलेले हे आवाज उंदीर,वटवाघळ आणि काही कीटक अशा काही प्राण्यांना मात्र निश्चितपणे ऐकू येतात. असा या संशोधकांचा दावा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime | पुण्यात पत्नीचा राग अनावर ; पतीच्या पोटात खुपसला चाक आहे कारण
Pune Accident News : ट्रॅक्टरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी..!
Pune :मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान; डॉ.कुमार सप्तर्षी यांना जाहीर