पुणे : अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचे नाव आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री.अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली. त्यात तिने ‘फॅट टू फिट’ ट्रांसफॉर्मेशन करून प्रत्येकाला आश्चर्यचकित केले. हे आव्हान तिच्यासाठी इतके सोपे नव्हते. यापूर्वी तिचे वजन ९५ किलो होते परंतु वर्कआउट आणि आहार योजनेद्वारे तिने वजन कमी केले.
भूमी लहानपणापासूनच खूप सक्रिय होती. तिला बॅडमिंटन खेळणे, पार्कमध्ये जॉगिंग करणे आणि चालणे आवडते. पण वजन वाढल्यानंतर ती जिममध्ये जाऊ लागली. भूमी सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाते. जॉगिंग आणि पार्कमध्ये रनिंग करते. दुपारी ती जिममध्ये जाते, जिथे ती १५ मिनिटे कॉडियो एक्सरसाइज करते. त्यानंतर ४० मिनिटांसाठी वैट ट्रैनिंग प्रोग्राम करते. संध्याकाळी ती व्हॉलीबॉल, बॅडमिंटन खेळते.तंदुरुस्त राहण्यासाठी भूमी कधीकधी तिच्या आवडीच्या गाण्यांवर नाचते.
डाइट प्लान
दिवसाची सुरूवात ती रोज रिकाम्या पोटी ५० मि.ली. कोरफड रस सेवन करून करते. भूमी शरीर डिटॉक्सीफाई करण्यासाठी गरम पाणी पिते. डिटॉक्सीफाईग पाणी तयार करण्यासाठी १ लिटर पाण्यात काकडीचे काही तुकडे, पुदीन्याची पाने आणि लिंबाचा रस मिसळते. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते. नाष्ट्यामध्ये स्किम्ड दूध, मूसली आणि सूर्यफूल बियाणे,व्हीट ब्रैड, २ अंड्यातील पांढरा भाग खाते.
दुपारचे जेवण
दुपारच्या जेवनात तिला मसूर, भाज्या, रोटी, ताक, दही खायला आवडते. ती मल्टीग्रेन रोटीस (ज्वारी, बाजरी, नाचगी, राजगिरी, हरभरा) लोणी लावून खाते. कधीकधी ग्रिल्ड चिकन सँडविच, ब्राउन, ब्रेड सैंडविच देखील खाते.
संध्याकाळी
ती नेहमी संध्याकाळी हंगामी फळे खाते. दररोज ग्रीन टी पिते आणि त्यासोबत सात नट्स नक्कीच खाते. भूमीला नॉन-वेजमध्ये ग्रील्ड चिकन आणि ग्रील्ड फिश खायला आवडते आणि शाकाहारी मध्ये तिला पनीर, टोफू, वाफवलेल्या भाज्या, तपकिरी ब्रेड सँडविच आणि मल्टीग्रेन रोटी खायला आवडते. भूमी दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात नेहमी घरी शिजवलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करते.
रात्रीचे जेवण
रात्री ८.३० वाजेपर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करते. भूमीला जंकफूड टाळण्यासाठी नेहमी काही आरोग्यदायी अन्न खाणे आवडते