शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला शिरूर पोलीसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी बिना नंबर प्लेटची एक खाकी रंगाची बुलेट, लौखड़ी पहार, कुऱ्हाड,स्प्रे पेन्ट, दोन मिरची पावडरच्या पुढया, रस्सी, मोबाईल असा १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
किसन रामा लखडे (वय-२२) अशोक उर्फ सोनु बबन जाधव (वय-२३) रूषीकेश बाळासो गरडकर (वय- २३ रा. तिघेही रा. आरोळे हॉस्पीटल शेजारी जामखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर) रवि रमेश नाईक (वय- २०, रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ०१) पहाटे साडेचार वाजण्याच्या शिरूर पोलिसांचे पथक गस्त घालीत होते. गस्त घालीत असताना नाद्रेमळा येथील कानिफनाथ मंदीराने भिंतीच्या आडोशाला काही इसम संशयास्पद रित्या उभे असलेले दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकूला असता चार इसम मिळून आले. त्यांना नाव न पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे सांगितले.
त्यांच्याकडे तपासणी केली असता पोलिसांना बिना नंबर प्लेटची एक खाकी रंगाची बुलेट, लौखड़ी पहार, कुऱ्हाड,स्प्रे पेन्ट, दोन मिरची पावडरच्या पुढया, रस्सी, मोबाईल मिळून आला. त्यांना का थांबले असे विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे मिळून आलेले हत्यारे व साधनावरून सदर आरोपी हे कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपींना कोर्टात हजर केले असता ३ तारखेपर्यंत रिमांड कस्टडी मंजूर करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण मा. मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूर पोलीस ठाणे, सपोनि अमोल पन्हाळकर, सहा फौजदार राजेंद्र साबळे, पोना नितीन सुद्रिक, पोकॉ योगेश गुंड, होमगार्ड सुहास आडगळे, राहुल चौगुले, पोलीस मित्र अक्षय काळे यांनी केली आहे.