राहुलकुमार अवचट
Rahul Kul | यवत : दौंड तालुक्यातील येणाऱ्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांसह भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढवणार असून या सर्व निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन करेल. असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.
सध्या सर्वत्र होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आज चौफुला येथे संपन्न झाला. यावेळी आमदार राहुल कुल बोलत होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, दौंड चे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते प्रेमसुख कटारिया भाजपा तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना वासुदेव काळे म्हणाले कि, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकारचे आहे. या संधीचा फायदा घेत बाजार समितीचा विकास साधायचा असेल तर दौंड बाजार समितीत सत्तापरिवर्तन झाले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार मोडीत काढला आहे. शेतक-यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या निवडणुका लढल्या पाहिजे. असे काळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने बाजार समितीत सर्वसामान्य शेतक-यांना मतदानाचा दिला अधिकार…
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने बाजार समितीत सर्वसामान्य शेतक-यांना मतदानाचा अधिकार दिल्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा ठराव वासुदेव काळे यांनी मांडताच कार्यकर्त्यांनी त्यास टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
यावेळी भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, महेश भागवत, तानाजी दिवेकर, आप्पासाहेब हंडाळ, धनाजी शेळके, पंढरीनाथ पासलकर, संजय इनामके, यांसह या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Farmer News | ज्वारीच्या दराबरोबर कडब्याला आला भाव ; ज्वारी प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रूपये दर
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे रामनवमी उत्साहात साजरी..!
Sucide News : पत्नीसह तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या ; एकास अटक