(Ajit Pawar) पुणे : लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अजून गिरीश बापट जाऊन फक्त तिसरा दिवस आहे. एवढी कसली घाई आहे? माणसुकी वगैरे प्रकार आहे की नाही? काही परंपरा महाराष्ट्राची आहे की नाही. लोक काय म्हणतील यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे की नाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांना फटकारले आहे
पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त…!
पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या जागेवर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आत्तापासूनच दावा सांगायला सुरुवात केली आहे.