Yavat Crime | उरुळी कांचन : यवत (ता. दौंड) येथील मुख्य बाजारतळा शेजारी असलेल्या पत्रा शेडमध्ये खुलेआम सुरु असलेल्या अवैध मटका जुगार अड्ड्यावर यवत पोलिसांनी शनिवारी (ता. ३०) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात अवैध मटका जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर तब्बल ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मटका चालक बबन मारूती शिंदे (रा यवत ता.दौड जि.पुणे) याच्यासह संतोष बाबुराव कबाडे (वय – ४२ रा. शेवाळवाडी ता.हवेली जि.पुणे मुळ रा.मदनुर ता.कमलनग जि. बिदर), सुनिल अर्जुन गायकवाड (वय – ४६) शिवाजी तुकाराम गाडे (वय -५०) अतुल नारायण जाधव (वय ५०, तिघेही रा.यवत ता.दौंड जि.पुणे), सचिन दिलीप पोटभरे (वय ३० कुदळे मळा यवत,मुळ रा. बाहेगावन ता.वडवोनी जि. बीड) व विकास जयराम हतागळे (वय -३३ रा. अशोक नगर वर्धा जि. वर्धा) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र संभाजी चांदणे सरकारच्या वतीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या बाजारतळा शेजारीच मोकळ्या जागेत पत्रा शेड मारून खुलेआम मुंबई आणि कल्याण नावाचा मटका सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी शनिवारी (ता. ३०) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा वरील ६ जण पोलिसांनी मटका खेळताना रंगेहाथ पकडले.
छाप्यात तब्बल ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…
दरम्यान, पोलिसांनी या छाप्यात तब्बल ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. जगताप करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : शिक्षेकेशी केली लगट : लग्नास नकार दिल्याने तीने गळफास घेत केली आत्महत्या..!
Pune Crime | पुण्यात दारू पिण्यावरून दोन गटात वाद ; एकावर हत्याराने वार