(Pune Crime )पुणे : व्याजाचे पैसे परत दिल्यानतंरही सावकाराकडून धमकी देण्याचा प्रकार पुणे शहरातील चंदननगरमधून समोर आला आहे. एकाने पाच टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेत त्यासाठी अडीच लाख रुपये परत केले मात्र त्यानंतरही सावकाराकडून आणखी पंच्चावण्ण हजार रुपयाची मागणी केली गेली. त्यासाठी वारंवर फोन करत शिवीगाळ केली व अपहरण करून पैसे फिटेपर्यंत शेतात कामावर ठेवण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार नोव्हेबर २०१२ पासून २० मार्च २०२३ पर्यंत सुरु होता.
याबाबत चंदननगरमधील एका ४५ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी भागवत पांडुरंग छत्रे (वय ४८, रा. गणेश पार्क, कावडेवखस्ती, खांदवेनगर ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
तक्रारदार व त्यांचे पती यांनी भागवत छत्रे याच्याकडून दरमहा पाच टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. त्यांच्या मोबदल्यात तक्रारदार यांनी त्याला फेब्रुवारी २०२३ पर्यंत अडीच लाख रुपये परत केले आहेत. तरीही भागवत हा रात्री अपरात्री वारंवार फोन करुन शिवीगाळ करतो. तुमचा तीन चाकी टेम्पो घेऊन जातो. तुम्हाला व तुमच्या पतीला टेम्पोमध्ये टाकून माझ्या गावाला घेऊन जातो व माझ्या शेतामध्ये पैसे फिटेपर्यंत कामाला ठेवतो, अशा वारंवार धमक्या देत आहेत.
तसेच त्याने २० मार्च २०२३ रोजी फिर्यादींना फोन करुन मुद्दल ५० हजार व त्यावरील व्याज ५ हजार असे रुपये एकूण ५५ हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवर टाक असे म्हणून आणखी पैशांची मागणी करुन पैसे दिले नाही तर काय होते ते बघ असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर मात्र तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन गाठले व याप्रकणी तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.