युनूस तांबोळी
Shirur News | शिरूर : शिरूर तालुक्यातील संविदणे येथील सरपंच शुभांगी विठ्ठल पडवळ यांनी महिलांसाठी अनोखा उपक्रम केला असून मोफत नेत्र शस्त्रक्रिया उपक्रम राबवुन १६ महीलाना नवी दृष्टी दिली आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील पदाधिकारी महिलांनी महिलांसाठी असे उपक्रम राबवावे. असे आवाहन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले आहे.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात संविदणे हे गाव महत्वाची भूमिका मिळविणारे गाव आहे. या गावच्या सरपंच पदाची धुरापुर्वी शुभांगी विठ्ठल पडवळ या उच्च शिक्षित महिलेच्या हाती दिली गेली. महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यातून गावातील गरीब महिलांनी त्यांच्याकडे नेत्र शस्त्रक्रीयेची मागणी केली.
त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सविंदणे ( ता. शिरूर ) येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व हेल्प एज इंडिया संस्थेमार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले. या शिबिरा मधून १६ महिला व पुरुष यांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल हडपसर, पुणे येथे करण्यात आले.
शस्त्रक्रिया पूर्ण पणे मोफत ….
नेत्र तपासणी झालेल्या रुग्नांशी संपर्क करून त्यांना पुणे येथे ऑपरेशन ला जाण्यासाठी नियोजन केले. विशेष म्हणजे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे पूर्ण पणे मोफत करण्यात आली. डॉ.अश्विनी कदम, डॉ. किरण वाबळे, डॉ.निशा दिपवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शस्त्रक्रिया पार पडले.
यावेळी सरपंच शुभांगी पडवळ, उपसरपंच भोलेनाथ पडवळ, माजी सरपंच सोनाली खैरे, माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे, ईश्वर पडवळ, गोरक्ष लंघे, रवी पडवळ, मालूबाई मिंडे,मनीषा नरवडे,नंदा पुंडे, रेखा भोर,राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, माजी सरपंच वसंत पडवळ, मोहन किठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पडवळ म्हणाल्या की, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्यात येईल. भविष्य़ात शेतकरी महिलांसाठी वेगळे उपक्रम राबवून गटशेती व सामुहिक कर्ज या बाबत उपाययोजना करण्यात येतील. नेत्र तपासणीसाठी महीला ढळल्यास त्यांच्यावरही शस्त्रक्रीया करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Shirur Crime : ऐन यात्रेच्या दिवशी पुण्यातील एका माजी उपसरपंचाला अटक ; काय प्रकरण ते जाणून घ्या
Shirur News : फाकटे येथे श्री रामनवमी यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Shirur Crime : गाडी सावकाश चालवा असे म्हणल्याच्या रागातून तिघांनी दिली एकाची दुचाकी पेटवून..!