Uruli-Kanchan News | उरुळी कांचन, (पुणे) : तरडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अभिषेक प्रभाकर दाभाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तरडेचे सरपंच भिकाजी गाढवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी अभिषेक दाभाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने नूरजहाँ सय्यद यांनी अभिषेक दाभाडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक सारिका कडूसकर यांनी पहिले. अभिषेक दाभाडे यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण केसकर, माजी सरपंच शरद जगताप, मारुती बरकडे,उपसरपंच मिना कोळेकर,ग्रामपंचायत सदस्य अनिता कुरकुंडे, रंजिता गाढवे, अश्विनी गवते, रेश्मा गायकवाड, अंकुश कोतवाल, ज्ञानेश्वर काळे, आत्माराम मेमाणे, वसंत जगताप, बापू बनकर, युवराज काळे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच अभिषेक दाभाडे म्हणाले, गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्व समाजघटकांशी समन्वय साधून गावातील विविध विकासकामे पार पाडणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Uruli Kanchan | उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचा ७७वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
Uruli Kanchan News : हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली गायकवाड यांची बिनविरोध निवड