Health Care : चेहऱ्यावर चरबी वाढल्याने डबल चीनची समस्या निर्माण होते. डबल चीनमुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा ही लटकलेली दिसून येते. या चरबीमुळे तुमच्या चेहऱ्याला काही आकार राहत नाही.
चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर शरीरातील फॅट्स कमी करावे लागतील. ही ज्यादाची चरबी कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी काही असे व्यायाम आहेत ज्याने तुम्ही लवकरात लवकर ती चरबी घालवू शकता.
जाणून घ्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय –
१. ओ’ओ’ आणि ई’ई’ मोठं तोंड करून म्हणावे. यामुळे स्नायू ताणले जातील आणि चरबी कमी होईल.
२. तोंडात जास्तीत जास्त हवा भरावी. नंतर, भरलेली हवा आत ठेवून, तोंड डावीकडे आणि उजवीकडे हलवा. असे दिवसातून ५ ते ७ वेळा करा.
३. चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर व्यायामात कार्डिओचा समावेश करा. यामुळे केवळ चेहऱ्याचीच नाही तर, शरीरातीलही चरबी कमी होते.
४. गाल फुगवणे, ओठ डाव्या-उजव्या बाजूला करणे, दातांवर दाब देऊन जबडा फिरवणे आदी हालचाली कराव्यात.
५. सरळ बसा तोंडात हवा भरा नंतर उजव्या आणि डाव्या बाजूला तोंडात आळीपाळीने हवा फुंकावी.
६. जीभ बाहेर काढा आणि तोंडात हवा भरून तुमची जीभ उजवीकडे आणि डावीकडे हलवा, असे केल्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा घट्ट होईल आणि चेहऱ्याची अतिरिक्त चरबीही निघून जाईल.
७. आधी मान उजवीकडे फिरवा आणि हनुवटीला खांद्याने स्पर्श करा, त्यानंतर डाव्या खांद्याने हनुवटीला स्पर्श करा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health Care | ‘या’ घरगुती उपायांनी घालवा टाचदुखी
Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी
पुणे भारती विद्यापीठात नोकरीची मोठी संधी ;; जागांसाठी होणार भरती