युनूस तांबोळी
शिरूर : Kavathe Yemai News – माय मराठी गळ्यात घाली लोककलेच लेण, मराठ मोळ गाण… लाख मोलाच सोन, या अशा विविध लोकगित तसेच चंद्रा या लावणीवर नृत्य सादर (Cultural program ) करत (Kavathe Yemai) कवठे येमाई ( ता. शिरूर ) (Kavathe Yemai News) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (Zilla Parishad Primary School) विद्यार्थ्यांनी पालक, विद्यार्थी (students) व ग्रामस्थांची मने जिंकली. (Kavathe Yemai News)
सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ…
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व मंथन स्कॅालशिप परिक्षेत गुणवत्ता मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शांताराम पोकळे हे होते. यावेळी सखाराम फंड, शरद भोर, शैला इचके, जयश्री कुंभार, प्रमिला गुळवे, कुंदा निचीत, प्रमिला मेसे, आशा शिंदे, शिल्पा गावडे आदी पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिक्षक, विद्यार्थ्यांची मनोगते झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्तीकी शिंदे यांनी केले. आर्यन पडवळ यांनी आभार मानले.
श्री गणेशा चा धडा गिरवत या मुलांनी इयत्ता पहिली पासून या शाळेत प्रवेश घेतला. शाळेची गुणवत्ता राखत वेगवेगळ्या उपक्रमातून शाळेची प्रगती साधली. परिसर स्वच्छतेबरोबर इतर विद्यार्थ्याना आदर्शवत काम केले. या पुढील काळात त्यांनी शाळा व गावाचे नाव उज्वल करावे.
शांताराम पोकळे
मुख्याध्यापक जिल्हा परिशद शाळा कवठे येमाई
शिक्षकांची आपुलकी संभाळत या मुलांनी शाळेच्या गुणवत्तेत आदर्शव्रत काम केले आहे. भविष्यात देखील या मुलांना पालकांच्या आदर्शासाठी काम होणे गरजेचे आहे.
प्रमिला मेसे
शिक्षिका
कला, क्रिडा मध्ये योगदान देऊन शाळेच्या प्रगतीसाठी विद्यार्थी घडवला गेला पाहिजे. यासाठी या विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. खरे तर या विद्यार्थ्यांनी याच शाळेत मागिल विद्यार्थ्यांना आदर्श घडवून दाखवला आहे.
जयश्री कुंभार
शिक्षीका
विद्यार्थी व शिक्षकांचे नाते हे अगदी आई वडीलांप्रमाणे असते. त्यातून विद्यार्थ्यांनी पाल्यांना अपेक्षीत अशी कामगीरी करणे गरजेचे आहे. स्पर्थात्मक युगात विद्यार्थ्यांनी नेहमीच प्रतिकुलतेवर मात करणे गरजेचे आहे.
कुंदा निचीत
शिक्षिका
प्राथमिक शिक्षण घेत असताना विद्यार्थी शिक्षणाचा भक्कम पाया तयार करत असतो. यापुढेही अनेक स्पर्धांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी योग्य तयारी करून यशस्विता मिळवावी.
शिल्पा गावडे
शिक्षिका