पुणे : Pune Crime -सायबर चोरट्यांचा नवीन फंडा (New Fund of Cyber Thieves) समोर आला असून, एका ज्येष्ठ नागरिकाला पावणे दोन लाखाला गंडा (the elder was extorted to the tune of two lakhs) घातला आहे. या ज्येष्ठाला युनो अकाउंट ब्लॉक होईल (In the name of blocking the account) अशी बतावणी करून त्यांना एक लिंक पाठवत पॅनकार्ड अपडेट करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यावरून ऑनलाईनरित्या पैसे ट्रान्सफर केले आहेत. (Pune Crime)
दत्तवाडी पोलीस ठाण्यात ६४ वर्षीय व्यक्तीने दिली तक्रार
याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात ६४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात मोबाईल धारक व बँक खाते धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबरमध्ये घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे युनो अकाऊंट आहे. दरम्यान त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोनकरून तुमचे अकाऊंट ब्लॉक होईल. तुम्ही तात्काळ पॅनकार्ड लिंकवर जाऊन अपडेट करा, असे सांगितले. त्यांना एक लिंक पाठवली. तक्रारदारांनी लिंक ओपनकरून त्यात माहिती भरली असता सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून १ लाख ७३ हजार रुपये ट्रान्सफरकरून फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.