Good News | पुणे : वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहे. शहरातीस पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तसेच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांना चालना दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महापालिकेने मोठा निर्णय जाहीर केला आहे.
नव्याने ई-रिक्षा घेणाऱ्या रिक्षाधारकांना अनुदान देण्याचे महापालिकेने केले जाहीर ….
नव्याने ई-रिक्षा घेणाऱ्या रिक्षाधारकांना महापालिकेने अनुदाने देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार 25 हजारांचे अनुदान देणार दिले जाणार आहे. शहरातील तब्बल पाच हजार रिक्षांना हे अनुदान दिले जाणार आहे.
हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट रिक्षाच्या परमिटधारकांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. महापालिकेस 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मिळालेल्या निधीतून या योजनेचा खर्च केला जाणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली असून, मुख्य सभेची मान्यता मिळताच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वायू प्रदूषण कमी होण्यासाठी यापूर्वी सीएनजी रिक्षांना 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र, 2018 मध्ये शहरात जवळपास सर्व रिक्षा सीएनजी झाल्याने तसेच शासनाकडूनच नवीन रिक्षा सीएनजीच्याच असण्याचे धोरण आल्याने महापालिकेने हे अनुदान बंद केले होते. ई-रिक्षाची किंमत जास्त आहे. त्यामुळे रिक्षाधारकांना ती परवडत नाही. अशा स्थितीत या अनुदानाचा रिक्षाधारकांना फायदा होणार आहे.
हे अनुदान देण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. तसेच केवळ प्रवासी रिक्षांना हे अनुदान दिले जाणार आहे. पुणे शहरात 1 जानेवारी 2022 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या पहिल्या 5 हजार रिक्षांना हे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी या रिक्षा थ्री व्हीलर पॅसेजर तीन वॅट प्रकरातील असणे बंधनकारक आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : मार्केटयार्ड व बिबवेवाडीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी ; १८ जणांना पकडले
Pune : आता पीएमपी तिकीटाचे पैसे घेणार ऑनलाईन ; सुट्या पैशांवरुन होणारा वाद टळणार
Pune News | सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे वितरण