पुणे : मार्केट यार्डातील (Market Yard) भुसार बाजार (Bhusar Bazar) परिसरातील एका किराणा मालाच्या दुकाराना लाग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (Firefighters) जवानांनी दाखल होत आग (fire)आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. किराणा मालासह मसाले, सुकामेव्याची विक्री या दुकानात केली जाते. आगीत किराणा माल, मसाले, सुकामेव्याची ( Packets of groceries, spices) पाकिटे जळाली.
मार्केट यार्ड भुसार बाजारातील प्रवेशद्वार क्रमांक पाच परिसरात अगरवाल ट्रेडर्स सुकामेवा, मसाले आणि किराणा माल विक्रीचे दुकान आहे. दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती सकाळी सव्वादहाच्या सुमारास अग्निशमन दलाला कळविण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे तीन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले.
आग भडकल्याने जवानांनी पाण्याचा मारा केला. धूर मोठ्या प्रमाणावर झाल्याने आग आटोक्यात आणताना अडथळे आले. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामात तसेच दुकानात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. शिडी लावून जवान गोदामात शिरले. पाण्याचा मारा करून अर्धा तासात आग आटोक्यात आणली.
दरम्यान, अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रदीप खेडेकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत दुकानातील मसाले, सुकामेवा, किराणा माल जळाला.
Pune Crime : मार्केटयार्ड व बिबवेवाडीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी ; १८ जणांना पकडले
Pune | रसदार फळे महागली, फळांच्या भावात ; एवढ्या टक्क्यांनी वाढ