Big News | लोणी काळभोर, (पुणे) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारात अनियमिता झाल्याचा ठपका ठेवून राज्य सरकारने बाजार समितीचे माजी प्रशासक आणि सचिव मधुकांत गरड यांना निलंबित केले आहे.
बाजार समितीने नियम डावलून कोट्यवधी रुपयांचे टेंडर मर्जीतल्या ठेकेदारांसह संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देणे, समितीच्या मालकीच्या मोक्याच्या जागा काही ठरावीक डाळिंब आडत्यांना अल्पदरात भाडेकराराने देणे, अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबबत वारंवार विविध वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
पणन संचालनालयाकडे अनेक तक्रारी…
तसेच पणन संचालनालयाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पणन विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनतर जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी चौकशीसाठी समिती नेमली. सहकारी संस्थांचे विशेष अतिरिक्त लेखापरीक्षक डी. एन. काळे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत बाजार समिती कारभारात अनियमितता आणि गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड यांच्यावर निलंबनाची कारवाई करून आदेश दिला आहे.
मधुकर गरड यांच्या निलंबनामुळे रिक्त झालेल्या सचिवपदाचा कार्यभार उपनिबंधक (सहकारी संस्था) डी. एस. हौसाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा अतिरिक्त कार्यभार असून, पुढील आदेशापर्यंत ते काम पाहणार आहेत, असे पणन संचालनालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, पणन संचालनालयाने यापूर्वीच मधुकर गरड यांच्याकडील प्रशासकपदाचा कार्यभार काढला होता. आता विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) संजय भोसले यांच्याकडे प्रशासकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आता बाजार समितीवर पूर्णत: नवीन प्रशासक कार्यरत राहणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
BJP News |भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज इंदापूर येथे जाहीर सभा : दीपक काटे