Health Care | काही लोकांना टाचदुखीची समस्या सतावत असते. टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या जाणवते. सुरुवातीलाच काही घरगुती उपाय केल्यास ही समस्या कमी होऊ शकते.
जाणून घ्या टाचदुखीवर घरगुती उपाय-
१. बर्फाने टाचेचा दुखणारा भाग १० ते २० मिनिटे शेका. बर्फाच्या थंडाव्यामुळे टाचेच्या मांसपेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते.
२. विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन घ्या. त्या तुकड्यावर रुईचे पान बांधा आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्या. यामुळे टाचदुखीला आराम मिळेल.
३. मऊ चप्पल वापरा. टाचेला आराम मिळतो.
४. टाचदुखीवर उपाय म्हणून काही सोपे व्यायामही आहेत. तुम्ही भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभं राहावं. तसेच पायांच्या बोटांवर उभं राहून थोडसं चालण्याचा प्रयत्न करावा.
५. गोडेतेल आणि मीठ एकत्र करून लेप तयार करा. हा लेप टाचेवर लावा आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवा.
६. कोमट पाणी घ्या त्यात खडे मीठ टाका. नंतर या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. असे केल्याने पायांना शेक मिळतो. तसेच टाचदुखीची समस्या कमी होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News : ओम उच्चारण केल्याने शरीराला होतात अनेक फायदे, जाणून घ्या
Health News | वजन कमी करण्यासाठी, चिया बिया गुणकारी; जाणून घ्या चिया बिया खाण्याचे इतर फायदे
Health News : अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे शरीराचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या