Chakan Crime | पुणे : मित्रांसबोत खेळायला गेलेला दहा वर्षाचा मुलाग संध्याकाळ झाली तरी घरी परतला नव्हता. काळजी पोटी घरच्यांची त्याची शोधाशोध केली. मात्र तो कोठेही मिळून आला नाही. शेवटी त्याच्या घरच्यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी त्याच्या मित्रांची चौकशी केली. चौकशीतून मिळालेल्या माहितीमुळे पोलिसांसह त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. मित्रांसह तो खाणीत पोहायला गेला त्यावेळी तो पाण्यात बुडाला असल्याची माहिती समोर आली. पुण्यातील चाकण [ Chakan Crime ] तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शोध घेण्यासाठी मावळच्या वन्यजीव रक्षक बचाव पथकाचे पाचारण…
पोलिसांनी मुलाच्या मित्रांकडे कसून चौकशी केली असता, त्यांना पोलिसांना खाणीत पोहायला गेलो होतो असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याबाहेर मुलाचे कपडे आढळले. त्यावरुन मुलगा पाण्यात बुडाल्याचे स्पष्ट झाले. पाण्यात त्याचा शोध घेण्यासाठी मावळच्या वन्यजीव रक्षक बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने पाण्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
खाणीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. यामुळे मुलाचे मित्र घाबरले अन् ते थेट आपापल्या घरी परतले. घरचे ओरडतील म्हणून त्यांनी याबाबत कोणालाच कळू दिले नाही. मुलगा बेपत्ता झाला म्हणून घरच्यांनी पोलीस तक्रार दिली असता सर्व प्रकार उघडकीस आला. मुलाच्या मृत्यूची बाब समोर येताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime | धक्कादायक : हाय होल्टेजच्या वायरने लागली रूमला भीषण आग; आगीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू