Sonu Nigam | मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमचे ( Sonu Nigam ) वडील आगम कुमार निगम यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी लाखोंची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. अवघ्या दोनच दिवसांत मुंबई पोलिसांनी लाखोंच्या चोरीचे गूढ उलघडले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे ७० लाख रुपयेदेखील जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी ड्रायव्हरला ८-९ महिन्यांपूर्वी आगम कुमार निगमने कामावर ठेवले होते. परंतु त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकले होते. याचा बदला घेण्यासाठी २२ मार्च रोजी संधी मिळताच त्याने आगमकुमार निगम यांच्या घरात चोरीसारखा धक्कादायक प्रकार केला होता.
अवघ्या दोनच दिवसांत मुंबई पोलिसांनी लाखोंच्या चोरीचे गूढ उलघडले…
दरम्यान, सोनू निगमची बहीण निकिता निगमने 22 मार्च रोजी आपल्या वडिलांच्या घरातून ७२ लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी त्यांच्या माजी ड्रॉयव्हरवरच संशय व्यक्त केला होता. संशयाच्या आधारे पोलिसांनी ड्रॉयव्हरचा शोध सुरु केला आणि दोन दिवसांच्या शोधानंतर त्याला अटक केली आहे.
चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्या माहितीवरुन पोलिसांनी कोल्हापुरातून चोरीस गेलेला ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालकासह आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
सोनू सूदने IAS विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं मोफत कोचिंग ; ट्विट करीत दिली माहिती