(Sanjay Raut) नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणार उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेत संजय राऊत (Sanjay Raut) यांना मोठा धक्का बसला आहे. राऊत हे संसदेत शिवसेनेचे नेतेपदी होते . मात्र आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रद्वारे माहिती दिली आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का…!
संजय राऊतांना संसदीय नेतेपदावरुन हटवून शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुन ठाकरे गट आक्रमक झाला असून खासदार संजय राऊत हे सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. यावरुन शिंदे गटाच्या आमदारांनी पलटवार करताना राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी असे म्हटले आहे. त्यातच आता संजय राऊतांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
लोकसभेतील 18 पैकी 13 खासदार शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती केली आहे. आता खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहिती दिली होती. त्यानुसार, गुरुवारी ही निवड करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??