Raj Thackeray | पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुडीपाडवा मेळावा मुंबईत काल पार पडला, यावेळी मनसे अध्यक्ष राज Raj Thackeray) ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम विरोधात भूमिका घेतली.
तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. या त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हिंदू – मुस्लिम दंगल घडू शकते, त्यामुळे ठाकरे यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीाचा तक्रार अर्ज पिंपरी- चिंचवडमधील वाकड पोलिसांत वाजीद रजाक सय्यद यांनी दिला आहे.
मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखावल्या….
वाजीद सय्यद यांच्या तक्रार अर्जात राज ठाकरे यांनी मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे हिंदू- मुस्लिम तणाव निर्माण होऊ शकतो. राज ठाकरे यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित सभेत भडकाऊ भाषण केले आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचेल असे शब्द वापरण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या भाषण हे राजकीय दबवातून केले आहे. असे नमूद केले आहे.
आता या तक्रार अर्जानंतर पोलिस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : आमदार रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने एकाच व्यासपीठावर