पुणे :Pune Crime बंद असलेल्या ऑफिसची चावी वॉचमनकडून घेऊन ऑफिस उघडून तब्बल सात लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकरा शहरातील पु. ल. देशांपडे बागेसमोर घडला आहे. ऑफिसचे मालक हे त्यांच्या भावाच्या लग्नाला गेले असता हा प्रकार घडला आहे. (Pune Crime )
दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी ऋतिक किशोर गिरमे (वय २३, रा. नांदेड सिटी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनिकेत घोडनदीकर याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ मार्च रोजी घडला आहे. परंतु, तक्रारदार हे त्यांच्या भावाच्या लग्नात बिझी होते. त्यामुळे त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे पु. ल. देशांपडे बागेसमोर ऑफिस आहे. त्यांच्या भावाचे लग्न असल्याचे ते बिझी होते. त्यामुळे ऑफिस बंद होते. यादरम्यान, अनिकेत व इतर त्यांच्या ऑफिसवर आले. तसेच, त्यांनी येथील वॉचमनकडून चावी घेतली. ऑफिस उघडून त्यातील रोकड, सोन्याचे दागिने, सीसीटीव्ही तसेच इतर ऐवज असा ३ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार लग्न सोहळ्यातून परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार समोर आला. त्यांनी लग्न सोहळा पार पाडल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.