Pandharpur | पंढरपूर : श्री विठ्ठलाची तुळशी पूजा भाविकांना करता येणार आहेत. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून दिली असून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांची माहिती…
भारताची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत ( Pandharpur ) श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात. मोठ्या यात्रांना तर लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या भाविकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या नित्यपुजा, पाद्यपुजा व चंदनउटी पुजा करण्यात येतात. या पुजांना मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच भाविकांच्या मागणीनुसार तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
कारण नित्यपुजा, पाद्यपुजा व चंदनउटी पुजा शिवाय भाविकांना पूजा सेवा करता यावी म्हणुन तुळशी पूजा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली. त्यानुसार मंदिर समितीच्या सभेत भाविकांना तुळशी अर्चन पुजा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला .त्यानुसार चैत्र शुध्द गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तांवर तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुजा यात्रा, सण, उत्सव आदी दिवस वगळून इतर दिवशी दैनंदिन सकाळी महानैवेद्यापुर्वी, दुपारी पोषाखापूर्वी व सायंकाळी धुपारतीपूर्वी या वेळेत प्रत्येकी दहा प्रमाणे एकूण 30 पुजा उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये एका पुजेसाठी जास्तीतजास्त 5 भाविकांना प्रवेश दिला जाणार असून, त्याचे प्रतिपुजा 2100 रुपयांची देणगी मुल्य राहणार आहे.
अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या नित्योपचार विभाग कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
तिसरीच्या विद्यार्थीनीचा पेपर लिहिताना ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू ; पंढरपूर येथील घटना