(Pune Crime) कोथरूड, (पुणे) : ओपन जीममध्ये व्यायामसाधनावर बसलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा विजेचा तिव्र झटका लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोथरूड येथील (Pune Crime) पौड रोडवरील संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानावर सोमवारी (ता. ०८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अमोल शंकर नाकती (वय-२३, रा. भूगाव, दौलत पेट्रोल पंपाचया पाठीमागे, ता. मुळशी असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा युवक या मंडळांचा कार्यकर्ता असून इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करायचा. तो रोज संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानात मित्रांसोबत यायचा. सोमवारी (ता. २०) व्यायाम करता करता फोनवर बोलत होता. अचानक तो खाली पडल्याचे पाहून मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, अग्निशमन अधिकारी पाथरकर, विद्युत वितरण अधिकारी साळुंखे, नगरसेविक अल्पना वर्षे, प्रशांत कनोजिया अदिनी भेट दिली. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील म्हणाले की, तपास सुरू आहे. पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यावर यावर अधिक सांगता येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : बिबट्याच्या हल्ल्यात गरोदर महिला जखमी ; पुण्याच्या आंबेगाव परिसरातील घटना!
Pune Crime : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; तब्बल 16 जणांना घेतले ताब्यात!