Pune Fraud News | पुणे : स्विफ्ट कार विकत घेण्याचे व ती कार कंपनीत भाडेतत्वावर लावून देण्याची बतावणी करत अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील ( Pune Fraud )बाणेरमधून समोर आला आहे. ही आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बाणेर येथील विजय वर्ल्डच्या मालकासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलाही समावेश आहे.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात कैलास बोंबले (वय २८) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून जयप्रकाश कोडलील यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रार अर्जावरून पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला असून, हा प्रकार गेल्या वर्षात घडला आहे.
५ वर्षांसाठी रेंटवर कार देण्याची बतावणी…
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना स्विफ्ट डिझायर कार विक घेणे कामी व ही कार एका कंपनीत ५ वर्षांसाठी रेंटवर लावून देण्याची बतावणी केली. त्यांना प्रतिमहिना ६० ते ७० हजार रुपये मिळतील असेही सांगितले गेले. त्यानूसार त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये घेतले. त्यांच्यासोबत इतरांना देखील या दोघांनी अशाचप्रकारे माहिती दिली.
सर्वांकडून एकूण १८ लाख ४५ हजार रुपये घेतले. परंतु, त्यांना कार घेणेकामी व ती कार कंपनीत न लावून देता त्यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime : कामवार ठेवलेल्या कामगाराकडूनच ग्राहक अन् मालकाची लाखोंची फसवणूक
Pune Crime : बिबट्याच्या हल्ल्यात गरोदर महिला जखमी ; पुण्याच्या आंबेगाव परिसरातील घटना