Warje News | पुणे : वारजे माळवाडी (Warje) भागातील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत वावरत असलेल्या बिबट्याला पोलीस अधिकारी व वन विभाग अधिकारी यांच्या दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश आले आहे.
पुणे शहर परिसरातील वारजे जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध करून घेऊन गेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माळवाडी यथील न्यू अहिरे परिसरातील एका इमारतीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी एक बिबट्या दिसून आला होता. परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. यावेळी सदर घटनेची माहिती पोलिसांना व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम यांच्यासह वारजे पोलिस घटनास्थळी पोहचले.
इमारतीच्या बाजूला असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये बिबट्या लपलेला होता. बिबट्याला पकडण्यासाठी एक मोठी जाळी टाकण्यात आली पण बिबट्याने तिथून पळ काढला. कोंढवे धावडेसह हिंजवडी भागातील फेज थ्रीमध्ये बिबट्या पाहायला मिळाला.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हिंजवाडी फेज थ्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील शिंदे वस्तीत संभाजी जाधव यांच्या घरात शिरूर पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा व्हिडीओ सीसी कॅमेरात कैद झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध केले. व सदर बिबट्याला घेऊन गेले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Yavat Crime | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ; यवत येथे घडला अपघात