(Bhalchandra Kulkarni) कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झाले आहे. ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शनिवारी (ता. १८) सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
हे गाणे खूप लोकप्रिय झाले…!
भालचंद्र कुलकर्णी यांनी ३०० पेक्षा अधिक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या. माहेरची साडी, शुभ बोल नाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, जावयाची जात, पिंजरा यासह अनेक चित्रपटात काम केले. १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.
अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका केल्या कोणताही कोणतीही भूमिका दिली तरी ती अतिशय परफेक्ट करण्यात त्यांचा हातखंडा होता. अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका केल्या कोणताही कोणतीही भूमिका दिली तरी ती अतिशय परफेक्ट करण्यात त्यांचा हातखंडा होता. भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Entertainment News : मराठी अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या!
Entertainment News : नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत!