(Pune Crime) पुणे : बलात्कार आणि अपहरण गुन्ह्यात गेल्या ४ वर्षांपासून फरार आरोपीला खडकी पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत न्यायालयान कोठडी सुनावली.
४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा…!
सॅम्युएल सुनिल पाटोळे (वय २७, रा. औंध रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर अपहरण व बलात्काराचा गुन्हा खडकी पोलिस ठाण्यात दाखल आहे.
सॅम्युएल याच्यावर २०१९ मध्ये भादवी कलम ३६३, ३७६ तसेच पोस्कोनुसार गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आले होते. पोलीस त्याचा शोध घेत असताना तो वारंवार जागा बदलून राहत होता.
दरम्यान, माहिती घेताना तो भाऊ पाटील रोडवरील एका रुग्णालयात आल्याची माहिती मिळाली. त्यानूसार वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : पुण्यात भल्या सकाळी चोरट्यांनी ज्येष्ठाला लुटत पळविला रिक्षा ; चोरट्यांचा शोध सुरू..!