पौड : Mulshi Crime News : शेजारी राहणाऱ्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीला (a little girl)चॉकलेटचे (chocolate) देण्याचे आमिष दाखवून (luring her) एका ७८ वर्षीय नराधमाने बलात्कार (78-year-old murderer raped) केल्याची धक्कादायक (accused was shackled) घटना मुळशी (Mulshi Crime) तालुक्यातील एका गावात घडली आहे. (Mulshi Crime News)
अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव
संतोबा वाघू कंधारे (वय ७८) असे या आरोपीचे नाव असून दहा तासांच्या शोधानंतर आरोपीला पौड पोलिसांनी कोळवण खोऱ्यातून अटक केली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी ही इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकते. तसेच आरोपी कंधारे हा त्यांच्या घराशेजारी राहतो. त्याची मुले पुण्यात राहत असून तो घरी एकटाच राहतो. कंधारे याने चिमुरडीला कॅडबरी, चॉकलेट, कुरकुरे या खाऊच्या पदार्थाचे आमिष दाखवले. गोड बोलून तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पौड पोलिसांची आरोपीच्या शोधकामी पाच पथके तयार करण्यात आली होती. आठ ते दहा तासाच्या वेगवेगळ्या शोधानंतर आरोपीला पौड पोलिसांनी कोळवण खोऱ्यातून अटक केली. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले हे तपास करीत आहे.