खेड : दोन मंदिरे फोडून चोरट्यांनी तब्बल १ लाखाचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना दावडी (ता. खेड) येथे शुक्रवारी (ता.२९) सकाळी उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दावडी परिसरातील आरूडमळा येथे डोंगरावर खंडोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिरात चोरट्यांनी प्रवेश गुरुवारी (ता.२८) रात्रीच्या सुमारास प्रवेश केला. आणि मंदिरातील ३ घंटे, दोन मोठ्या समई, दोन कर्ण या साहित्याची चोरी केली.
त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शंकर मंदिराकडे वळविला. चोरट्यांनी शंकर मंदिर मंदिरारातील २ घंटे, ताब्यांची भाडी, दोन छोट्या समई, सांऊड बॉक्स असा एक लाख रुपायांचा ऐवज चोराला. आणि चोरटे फरार झाले.
शुक्रवारी सकाळी एक भाविक मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर सदर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तरी, पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.
दरम्यान, दावडी गावाच्या परिसरात दिवसेंदिवस कृषी पंप, केबल, मंदिरातील चोऱ्या वाढल्या आहेत. याचा पोलिसांना उदयाप शोध लागला नाही. त्यातच अजून एक चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनांना आळा घालावा. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे