पुणे : Rupali Patil News : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यावरील एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच संताप देखील व्यक्त केला जात आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील (Rupali Patil’s reaction) यांनी प्रतिक्रियी दिली आहे. आमचा (Rupali Patil News) राजकीय विरोध असला तरी आम्ही शीतल म्हात्रेंच्या पाठीशी आहोत. असे त्यांनी सांगितले आहे. (What you sow will grow… even if we are against it, we are with the elders)
शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा माॅर्फ केलेला एक व्हिडिओ व्हायरल
शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा माॅर्फ केलेला एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी. जे पेरल तेच उगवलं आहे. त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसत आहे.’ अशी टीका करत महिला म्हणून आम्ही शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे निंदनीय आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
शीतल म्हात्रेंचा असा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खूप दु:ख झाले आहे. महिलांचे असे व्हिडिओ सोशल माध्यमांवर टाकले जातात. मात्र अशांवर कारवाई होत नसल्याने यांची हिम्मत वाढली आहे. असा संताप पाटील यांनी व्यक्त केला. सार्वजनिक ठिकाणी राजकारणी महिला अशी कृत्य करेल वाटत नाही. याची खात्री आहे. व्हिडिओ कोणी व्हायरल केला आहे, याचा तपास करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.