अजित जगताप
वडूज : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या हायस्कूल मध्ये विद्यार्थी, शिक्षिका व खटाव सहाय्यक निबंधक अशी वडूज नगरीत तीन रूपे विजया बाबर यांची पाहण्यास मिळाली अशा शब्दात अनेक मान्यवरांनी गुणगौरव करण्यात आला.
सहकार क्षेत्रात कार्यरत असताना नियम व शिस्तबद्ध कामगिरी बजावली आहे. कोणाचीही तक्रार नाही. आज अनेक कामांमुळे अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये समनव्यातुन असणे गरजेचे आहे. हीच भूमिका घेऊन सौ बाबर यांनी कार्य केले. हिंदी भाषेत शिक्षण देणाऱ्या या शिक्षिकांनी वडूज, आटपाडी, कुरोली या ठिकाणी पंधरा वर्षे सेवा करून नंतर सहकार क्षेत्रात अधिकारी होण्याचा मान मिळविला. त्यांची प्रेरणा घेऊन माता-भगिनींनी कार्य करावे. या वाटचालीत विटा मर्चंड बँकेचे अधिकारी श्री बाबर यांची मोलाची साथ मिळाली आहे.
या सेवानिवृत्त सत्कार समारंभाला जेष्ठ पत्रकार प्रा. नागनाथ स्वामी, सतिश शेटे, धनंजय क्षिरसागर,नितीन राऊत, पांडुरंग तारळेकर,आनंदा साठे, प्रशांत फडतरे, सुधीर पवार,केदार जोशी, दत्ता इनामदार, मुन्ना मुल्ला, समीर तांबोळी, शरद कदम, डॉ विनोद खाडे, महेश गिजरे, खुस्पे, शंकर सावंत,,यमगर,भोसले, स्वप्नील माळी व वडूज सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारी व इतर वर्ग उपस्थित होते.पाच वर्षांच्या काळात माण-खटाव तालुक्यात त्यांनी काम करताना कर्मचाऱ्यांना पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अनेक प्रकरणी सहकारातील काहींनी न्यायालयात धाव घेतली.त्याला ही तोंड दयावे लागले होते
दरम्यान, विजया बाबर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर भविष्यात लेखन, गायन व इतर छंद त्यांनी जोपासले पाहिजे यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.