( Pune News ) पुणे : लोक जनशक्ती पार्टी चे संस्थापक,माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण दिवंगत रामविलास पासवान यांचा मेणाचा पुतळा लोणावळा येथील सुप्रसिद्ध वॅक्स म्युझियम येथे बसविण्यासाठी पुणे शहर-जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट,कार्याध्यक्ष शरद टेमगिरे, सरचिटणीस के.सी. पवार,बंडू वाघमारे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी शनिवारी लकी सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम चे संचालक ललित देवा यांची भेट घेतली आणि पुतळा निर्मिती,उभारणीबाबत चर्चा केली.यासाठी लागणारा खर्च लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)पुणे शहर- जिल्हा यांच्यावतीने देण्यात येणार आहे.
रामविलास पासवान यांचा जीवन परिचय आणि छायाचित्रे यावेळी वॅक्स म्युझियमकडे सुपूर्द करण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Beauty Tips : त्वचेच्या सौंदर्य वृद्धीसाठी मीठ उपयोगी, जाणून घ्या कसा करावा वापर