पुणे – वाघोली परीसरातील एका 26 वर्षीय तरुणाला अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध ठेवणे तब्बल 67 लाखाला पडले आहेत. अल्पवयीन मुलीने हडपसर परीसरातील आपल्या दोन मित्रांच्या मदतीने 26 वर्षीय तरुणाकडुन मागिल दोन वर्षाच्या काळात तब्बल 67 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक बाब पुढे आले आहे. फसवणुक झालेल्या 26 वर्षीय तरुणाने कोंवा पोलिसात तक्रार केल्यानंतर, वरीलसधक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
वाघोली परीसरातील एका २६ वर्षाच्या तरुणाने अल्पवयीन मुलगी व तिच्या दोन साथिदारांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. चेतन रवींद्र हिंगमिरे व निखील ऊर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (रा. दोघेही गाडीतळ, हडपसर) ही त्या अलप्वयीन मुलीच्या मित्रांची नावे असुन, पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
याबाबत कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघोली परीसरातील वरील तरुण आणि एका मुलीचे मागिल दोन वर्षापासुन प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांच्यात शारीरीक संबंध निर्माण झाले. फिर्यादी तरुण अल्पवयीन तरुणीच्या प्रमात पागल झाल्याची संधी साधत, अल्पवयीन तरुणीने आपल्या वरील दोन मित्रांच्या मदतीने फिर्यादीला लुबाडण्याचा कट रचला.
फिर्यादी तरुण दोन वर्षापुर्वी भेटण्यासाठी आला असता, संबधित मुलीने आपण प्रेंगन्ंट असल्याचे त्या मुलाला सांगितले. तसेच त्याच दरम्यान चेतन हिंगमिरे व निखील म्हेत्रे या दोघांनी फिर्यादीला भेटुन, ही मुलगी अल्पवयीन आहे. तसेच तुझ्यामुळे तिला गर्भधारणा झाली आहे, असे सांगून ती पोलिसांकडे बलात्काराची तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादीच्या घरी हे सांगण्याचीही धम की दिली.
घाबरलेल्या वरील तरुणाने यातुन बाहेर काढण्याची विनंती चेतन हिंगमिरे व निखील म्हेत्रे यांच्याकडे केली. यावर वरील प्रकरण मिटविण्यासाठी पैशाची मागणी केली. पैशाचा पहिला हफ्ता मिळाल्यानंतर, मागिल दोन वर्षाच्या काळात विवि्ध प्रकारच्या धमक्या देऊन, वरील तिघांनी फिर्यादीकडुन तब्बल 67 लाख रुपये लाटले. एवढी मोठी रक्कम मिळुनही, तिघांनी फिर्यादीकडे पैशाची मागणी सुरु ठेवली होती. पैसे मिळत नसल्याचे लक्षात येताच, चेतन हिंगमिरे व निखील म्हेत्रे या दोघांनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. या धमकीला कंटाळुन अखेर वरील फिर्यादीने पोलिसात धाव घेतली व वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.