राहुलकुमार अवचट
(Health News) यवत : माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील यवत पालखी भवन जागतिक महिला दिनानिमित्त सामान्य जनतेसाठी मोफत रेशनिंग कार्ड व आरोग्य तपासणी संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. माहिती सेवाभावी संस्थेचे रमेश अवचट यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. प्रवीण बडे व सहकारी, रोटरी ब्लड बँक पदाधिकारी, उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन…
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप लगड यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली व यापुढील काळात दौंड तालुक्यात सर्वत्र अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जातील असे सांगितले.या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, रेशनिंग कार्ड कॅम्प, आधार कार्ड कॅम्प यांसह जागतिक महिला दिनानिमित्त हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये रेशनकार्ड (दुबार, विभक्त, नवीन, नाव वाढवणे, नाव कमी करणे, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आधी योजनांची माहिती देण्यात आली, जवळपास 200 वरून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी, रेशनिंग कार्ड शिबिरामध्ये सहभाग घेतला महा-ई-सेवा केंद्र चालक अनिता स्वामी यांनी शिबिरास भेट दिली. आधार कार्ड काढण्यासाठी सहकार्य केले जाईल असे सांगितले व आधार कार्ड काढण्यासाठी यंत्रणा उपस्थित केली, परंतु अचानक वीज केल्याने आधार कार्ड काढण्यासाठी अडथळा निर्माण झाला. माननीय तहसीलदारांचे आदेश असूनही महा-ई-सेवा चालक अजय पांढरे यांनी शिबिरास भेट देखील दिली नाही किंवा कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध करून दिली नाही यामुळे संस्थेने नाराजी व्यक्त केली.
शिबिरासाठी आजी – माजी सैनिक, त्रिदल सैनिक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य व त्रिदल महिला शक्ती आघाडी, महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याने कार्यक्रमाला जणू काही छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते.
यावेळी त्रिदल महिला शक्तीच्या भारती लगड , ग्रामपंचायत सदस्या मनीषा रायकर, सुजाता कुदळे, काँग्रेसचे दौंड विधानसभा अध्यक्ष विठ्ठल दोरगे, भरतगावचे माजी उपसरपंच उत्तम टेमगिरे, हभप गणेश महाराज दोरगे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भालेराव यांसह माहिती सेवाभावी संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Women Day Special : यवत येथील महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिलादिन साजरा
यवत येथील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून साजरा केला प्रजासत्ताक दिन
दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा व यवत येथे गोवा ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत