(Pune news) पुणे : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे कालीचरण महाराज तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे पुण्यात येणार असून शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे त्यांची जाहीर हिंदू धर्मजागरण सभा आयोजित करण्यात आली आहे. आज ( ता. ११) सायंकाळी ७ वाजता त्यांची सभा (public meeting) आहे.
हिंदू समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी ही हिंदु धर्मजागरण सभा…
सनसिटी रस्ता, भाजी मंडई शेजारी, सिंहगड रस्ता (sinhgad road) पुणे येथे हिंदू समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी ही हिंदु धर्मजागरण सभा होणार आहे.या सभेसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंजुषा नागपुरे यावेळी उपस्थित राहतील. प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजयंती महोत्सवाचे हे अठरावे वर्ष आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि विचारांचा जागर अधिक जोमाने व्हावा आणि हिंदू समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू बांधवानी संघटीतपणे उभे राहावे, हा या सभेमागील उद्देश आहे. या सभेचे आकर्षण म्हणजे श्रद्धेय कालीपुत्र कालीचरण महाराज त्यांच्या खड्या आवाजात शिवतांडव स्तोत्र म्हणणार आहेत.
वादग्रस्त वक्त्याव्यावरुन कालीचरण महाराज कायम चर्चेत चर्चेत असतात. त्यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनेकांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना अटकही करण्यात आली होती.
‘कालीचरण महाराज’ अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune News : आजीची चेन चोरणाऱ्या चोरट्याला नातीने दाखवला इंगा ; १० वर्षीय नातीचं सर्वत्र कौतुक..!