(Hadapsar News) हडपसर : हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar) एक अधिकारी अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गायब असलेला पोलीस अधिकारी साहेब मी जाऊन येतो असे वरिष्ठांना सांगून गुरुवारी (ता. ९) पोलीस ठाण्यातून (Police station) निघून गेला होता. मात्र तो परतलाच नाही. यामुळे वरिष्ठ अधिकारी देखील चिंतेत आले आहे.
पोलीस दलात खळबळ…!
या पोलीस अधिकाऱ्याला काही दिवसापूर्वी बढती मिळाली होती. या पोलीस अधिकाऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली होती. मात्र आजारी असल्याने बरेच दिवस हा पोलीस अधिकारी रजेवर होता. गेले काही दिवस हा पोलीस अधिकारी तणावात असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र गुरुवारी रात्री हा पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यामधून निघून गेला तो अद्याप परतला नाही.
दरम्यान, पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताना पोलीस निरीक्षकांने वरिष्ठांना ,’साहेब मी जाऊन येतोय’, असे म्हटले होते. त्यानंतर तो अधिकारी पोलीस ठाण्याच्या बाहेर पडला. यावेळी त्या पोलीस अधिकाऱ्याने गाडीची चावी आणि मोबाईल पोलीस ठाण्यामध्येच ठेवले होते. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर हा अधिकारी परतलाच नाही आणि बेपत्ता झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
हडपसर टर्मिनल येथून रेल्वे गाड्या वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन
Big Breaking : पुणे-सोलापूर डेमू ट्रेन आता हडपसरहून सुटणार..!