(Shiv Jayanti 2023) पुणे : विविध संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti)शहरात शुक्रवारी (ता. १०) मिरवणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल ( traffic changes )करण्यात आले आहे.तसेच वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
मिरवणुकीचे मार्ग…
शिवजयंतीची मुख्य मिरवणूक भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून रामोशी गेट चौक, नेहरू रस्त्याने ए. डी. कॅम्प चौक, संत कबीर चौकातून नाना चावडी चौकी, अरुणा चौक, नाना पेठ चौकी, अल्पना टॉकीज, डुल्या मारुती चौक, हमजेखान चौक, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशीद चौक, सोन्या मारुती चौक, फडके हौद चौकातून लाल महालापर्यंत जाणार आहे.
नेहरु रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यानंतर पॉवर हाऊसकडून सेव्हन लव्हजकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कादर चौक- क्वार्टर गेट चौक, जुना मोटार स्टॅन्डमार्गे जावे अथवा पॉवर हाऊस ते समर्थ पोलिस ठाणे ते शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट या मार्गाचा वापर करावा. तसेच, सेव्हन लव्हज चौकाकडून पॉवर हाऊसकडे जाणाऱ्यांनी बाहुबली चौक राजसबाई गंगाळे पथ-जुना मोटार स्टँडमार्गे जावे.
लक्ष्मी रस्त्यावरील (laxmi road) वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणाऱ्यांनी नेहरू रोड- पॉवर हाऊस चौक- अपोलो टॉकीज- फडके हौद-जिजामाता चौकमार्गे जावे. तसेच, देवजीबाबा चौकाकडून मीठगंज चौकमार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्यांनी देवजीबाबा चौक ते दारुवाला पूल-अपोलो सिनेमा ते पॉवर हाऊस चौकातून नेहरु रस्त्याचा वापर करावा.
गणेश रस्त्यावरील वाहतूक आवश्यकतेनुसार शिवाजीरोड मार्गे गाडगीळ पुतळा, बुधवार चौकमार्गे इच्छितस्थळी जाईल. मिरवणूक मोती चौक, फडके हौद चौकापुढे गेल्यानंतर वाहनचालक केळकर रस्त्याने (kelkar road) बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिरमार्गे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार अप्पा बळवंत चौक, बुधवार चौकातून वळून बाजीराव रस्त्याने, शिवाजी रस्तामार्गे इच्छितस्थळी जातील.
शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. तसेच, स.गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. मिरवणुकीच्या मार्गांवर दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास बंदी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून उरुळी कांचन येथील गर्दीच्या ठिकाणी सूचना फलक..!