पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad ): महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे(Prathamesh Abnave) यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी (Pimpri-Chinchwad Youth Congress) नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रथमेश आबनावे
सरचिटणीस म्हणून प्रभावी काम केल्याने आबनावे यांना अहमदनगर ग्रामीण व सोलापूर ग्रामीण प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या वर्षभरातील कामगिरी, तसेच नुकत्याच झालेल्या कसबा मतदारसंघातील निवडणुकीत विजय मिळण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पक्षाने त्यांना पिंपरी-चिंचवडचे प्रभारी म्हणून काम पाहण्याची संधी दिली आहे.
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, राज्याचे प्रभारी मितेंद्र सिंग, सहप्रभारी प्रदीप सिंधव, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पक्षातील सहकाऱ्यांनी टाकलेला विश्वास व दिलेली संधी याबद्दल आभार मानतो. आगामी काळात पिंपरी-चिंचवडमध्ये युवक काँग्रेसचे काम प्रभावी होईल, अशी ग्वाही आबनावे यांनी दिली.