राजेंद्रकुमार शेळके
(Hadapsar News) हडपसर : शहराचा विकास होत असताना ग्रामीण भागाचा विकास होणे व त्यामध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे, असे मत घेरा पानवडीचे सरपंच अनिल रांजणे यांनी व्यक्त केले.
‘युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास’ या संकल्पनेतून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर घेरा पानवडी (ता. पुरंदर) येथे नुकतेच पार पडले. यावेळी सरपंच रांजणे बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रितेश पाटील, ग्रामसेवक भाऊसाहेब गरड, विनायक झिंजुर्के, फिरोज पंडोल, उपसरपंच उमेश मिसाळ, माजी सरपंच मोहन ढागरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरामधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. ‘
प्रशासकीय अधिकारी विनायक झिंजुर्के, श्रीकृष्ण फुलवरे, अमोल पठारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच एकीचे बळ, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण या विषयांच्या आधारे पथनाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश दिला.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.रवींद्र मोजे, संदीप टिळेकर, प्रा. संदीप उंद्रे, प्रा. नयना गवळी, प्रा. अंजुम गुडमिठे, प्रा.स्वाती बनकर, मनोज सुतार, धनराज डुंबरे, विद्यार्थी प्रतिनिधी आशिष जगनाडे, अमित देशमाने, दिव्या अदक, शिवानी कळमकर यांनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी घेरा पानवडी गावचे प्रथमेश खरात व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
दरम्यान, शिबिरामध्ये ५० स्वयंसेवक सहभागी झाले. या शिबिरा दरम्यान गावकऱ्यांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. गरजूंना मोफत चष्म्याचे वाटपही करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राजे शिवराय विद्यालयाचे प्राचार्य अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन आदित्य मोरे, साक्षी कांबळे, वैष्णवी कुतवळ यांनी केले. आभार प्रास अनिकेत खेडकर, शेखर पवार यांनी मानले.