(Talegaon Dabhade News ) पुणे : जुने पुणे- मुंबई महामार्गावरील अनधिकृत सोमाटना टोल नाका हटविण्याच्या मागणीसाठी तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) शहरातील नागरिकांनी बंदची हाक दिली आहे. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सोमाटने टोल नाका हटाव कृती समितीने टोल नाका हटविण्याच्या मागणीसाठी बंदचा इशार दिला होता. त्यानुसार अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असून बंद पाळण्यात येत आहे.
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…!
यापूर्वीही अनेकदा आंदोलन करून टोल हटवण्याची मागणी कृती समितीने केली. परंतु, आता थेट इशारा देत तळेगाव बंदची हाक देण्यात आली होती. त्या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद तळेगावकारांनी दिला असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सोमाटने टोल नाका हटवण्याची मागणी संबंधित कृती समिती करत आहे.
सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचे काम आयआरबी करत असून तो टोल नाका हटवावा अशी मागणी सोमाटने टोल नाका कृती समितीने केली आहे. जुना पुणे- मुंबई महामार्गावरून लाखो वाहने ये- जा करत असतात. तळेगाव एमआयडीसीत पिंपरी- चिंचवड, पुणे आणि देहूरोड येथील शेकडो नागरिक कामानिमित्त येतात. त्यांना दररोजच टोल नाक्याच्या अरेरावीला सामोरे जावे लागते असा आरोप संबंधित कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे. टोल हटावची मागणी पूर्ण न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील सदस्यांनी दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Dehu News : तुकोबारायांच्या नामाच्या, विठ्ठलाच्या नामाच्या गजराने दुमदुमली देहूनगरी !
Breaking News : नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप यांनी घेतली शपथ..!