युनूस तांबोळी
(Shirur News) शिरुर : शैक्षणिक धोरणा नूसार शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. माञ व्यवहारातील अचूक ज्ञानासाठी शिक्षणाचा खर्च वाढला आहे. सर्वसामान्य जनतेला हा खर्च पेलवणारा नाहि. त्यामुळे शैक्षणिक आर्थिक विषमता वाढत चालली आहे. असे मत तेजस्वीनी फाऊंडेशन च्या अध्यक्ष वैशाली चव्हाण यांनी आमदाबाद ( शिरूर) (Amedabad Shirur News) येथे मत व्यक्त केले.
जागतिक महिला दिन
मा.पांडुरंग आण्णा थोरात माध्यमिक विद्यालय, आणि जि.प.प्राथ.शाळा आमदाबाद ( शिरूर ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन (International Women’s Day) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त डॉसोनाली हार्दे आणि निता गायकवाड यांचे किशोर वयीन मुलांसाठी आईची भूमिका आणि सोशल मिडिया चा अतिरेक या विषयावर महिलांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
तसेच तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण व सामर्थ्य फाउंडेशन, उस्मानाबाद च्या अध्यक्षा रणजीता मॅडम यांनी उपस्थित महिलांना आर्थिक साक्षरता संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन आणि विजेत्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसे ही देण्यात आली.
या कार्यक्रमानिमित्त वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या सचिव उषा वाखारे,आमदाबाद गावचे नवनिर्वाचित सरपंच लीलाबाई पवार, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिता घुले, माजी ग्रामपंचायत सदस्य उषा साळवे, अंगणवाडी शिक्षिका अरुणा क्षिरसागर आणि राजश्री थोरात तसेच मोठ्या संख्येने महिला पालकवर्ग उपस्थित होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक महिला दिनानिमित्त जि.प.प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांनी महिलांना मार्गदर्शन केले इ.नववीच्या विद्यार्थीनी भाग्यश्री घुले व सलोनी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.