पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत. याबाबतीत बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
२१ फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा गुण होते. आता बोर्डाने इंग्रजी पेपरमधील चुका मान्य करत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना त्या तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देण्यात येणार आहेत.
बोर्डाकडून निर्णय देत सांगितले आहे की, बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येतील. इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितले होते.
दरम्यान, यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालामध्ये इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचे बोर्डाने मान्य केले आहे. तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या.